ब्रम्हपुरी:- शिक्षणासाठी मित्र एकत्र येतात. दोन वर्ष शिक्षण प्रशिक्षण घेतात. मग नोकरी कामधंद्यामध्ये गुंतून जातात. वर्षामागून वर्ष निघून जातात. एक दोन नाही, तर तब्बल तीस वर्षानंतर पुन्हा गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. एकमेकांच्या गळाभेटीने अनेकांचे डोळे पाणावले. ही गोष्ट आहे 1991-1993 च्या डी. एड. मित्रांची.
या बॅचमध्ये जिल्याच्या विविध तालुक्यातून ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा, भद्रावती, कोरपना राजुराच नाही तर यवतमाळ, अमरावती, अहमदनगर येथील चाळीसजण शिक्षण घेत होते. ते पूर्ण झाल्यानंतर आपआपल्या तालुक्यात जिल्यात नोकरीवर कार्यरत होते, ते सारेजण रविवारी ताडोबाच्या निसर्गरम्य परिसरात तब्बल तीस वर्षानंतर एकत्र आले.
यावेळी सुभाष झाडे, उपेंद्र दमके, देवानंद तुलकाने, अभय मस्के, सुशील ठेंगरे, गजानन कहूरके, पांडुरंग खारकर, उषा खैरे, यांनी आपल्या जीवनातील चढउतार सांगितले. निलकंठ परचाके, छाया जांभुळे, शेखर दहिवले, यांनी गीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विजय बांदूरकर, राजू काकडे, महेंद्र रामटेके, नीता दिवसे, कविता काकडे, माधुरी मांढरे, लता फुलझेले, अरुण यामावार उपस्थित होते. दिनेश साठे यांनी सूत्रसंचालन तर पूनम सोरते यांनी आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....