कारंजा (लाड) : शहरातील विविध भागात राहणारे नागरिका समोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे, कारंजा शहरात नगरपरिषद आहे की नाही? शहराची अवस्था पाहील्यानंतर हा प्रश्न निर्माण होतो,शहरातील अनेक ठीकाणचे नागरीक विविध समस्यांची तोंडी तक्रार घेऊन नगरपरिषद प्रशासन कडे गेले परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही असे नागरिकांचे म्हणणे होते,शेवटी शहरात सामाजिक श्रेत्रात काम करणारे समाजसेवक तथा काँग्रेस सेवादल नेते अब्दुल राजीक अब्दुल अजीम व समाज सेवक मोहम्मद सलीम तेली, यांनी शहरातील विविध परिसरात पाहणी करून नागरिकांच्या समस्यांचे लेखी निवेदन कारंजा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना दिनांक २४/०८/२०२४ला दिले,सदर निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील अल्कबीर नगर, लीलावती काॅलोणी, गुरुदत्त नगर, लोकमान्य नगर, रहमान नगर, गौस नगर, अतुल नगर नशेमननगर समता नगर श्रीनाथ नगर आजम नगर,या परिसरात मागील ८ते दहा वर्षांपासून नागरिक परिवरासह राहत आहे, परंतु त्यांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,वरील परिसरात पक्के रस्ते नाही, नाल्यांचे बांधकाम नाही,कच्चे नाल्या सुध्दा नसल्याने घरातील सांड पाणि रस्त्यावर साचत असल्याने आरोग्याला धोकादायक आहे, लहान लहान शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करण्यासाठी व नागरिकांना जाणे करण्यासाठी तारेवरची कसरत करुन गेल्या सारखे जावे लागत आहे, रस्त्यावर खड्डे पडले आहे,पाऊस आल्यावर खड्यात पाणी भरूण असते त्यामुळे पायी जाणे करत असतांना खड्डे दिसत नाही, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रस्त्यावर चिखल राहत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो,सदर परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करावे तसेच सदर परिसरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम लवकर लवकर करावे अश्या मागणीचे निवेदन हजरत काँग्रेस सेवादल वाशिमचे अब्दुल राजीक अब्दुल अजीम व समाज सेवक मोहम्मद सलीम तेली यांनी कारंजा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना दिले आहे