कारंजा : शहर पोलिस स्टेशन पासून,हाकेच्या अंतरावर , मंगरूळवेशी बाहेर ऋषी तलावाच्या परिसरात आणि इतरत्र ठिकाणी अवैध दारू विक्री आणि वरली मटक्याच्या व्यवसायाला प्रचंड ऊत आलेला असल्याच्या तक्रारी येत असून, परिसरातील मातंग पुर्यात दिवसेंदिवस मारहाणीच्या घटना घडत असल्यामुळे,
या व्यवसायांचा मास्टरमाईन्ड कोण ? आणि कुणाच्या वरदहस्ताने अवैध व्यवसाय सुरु आहेत ? याचा शहर पोलिस स्टेशनने शोध घेऊन, असे परिसरातील वातावरण बिघडविणाऱ्या अवैध व्यवसायाची स्थानिक शहर पोलिस स्टेशनचे, पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांनी स्वतः जातीने शहनिशा करून, दखल घेऊन संबधितांवर कठोरात कठोर कार्यवाही करून, मंगरूळ परिसरातील सर्वच अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी परिसरातील महिला वर्गाकडून आणि नागरिकांकडून होत असल्याचे वृत्त आहे.