मागील अनेक दिवसांपासुन ब्रम्हपुरी तालुक्यात बऱ्याच समस्या आवासुन उभ्या आहेत. गेल्या सरकार मध्ये याच विधानसभा क्षेत्रातील आमदार मंत्रिमंडळात मदत व पुनर्वसन मंत्री असुन सुद्धा तालुक्यातील सामान्य जनतेच्या व ईथल्या स्थानिक समस्या सुटलेल्या दिसत नाहीत. अनेक संघटनांच्या माध्यमातुन तालुक्यातील अनेक समस्यांना वाचा फोडुन निवेदनातुन मागण्या करण्यात आल्या मात्र ईथल्या शेतकऱ्यांचे, कामगारांचे, घरकुल लाभार्थ्यांचे, रस्ते- वाहतुक, स्वच्छ पाणी, अतिवृष्टी पुरबाधित शेतकरी, जब्रानजोत शेतकरी, बेरोजगारी, अवैध उत्खननांना व अवैध धंद्यांना आळा घालणे, अश्या अनेक समस्या मार्गी लागु शकल्या नाही. मागील दोन अडीच वर्ष्यात तालुक्यात फक्त कार्यालयांच्या ईमारती व सार्वजनिक बांधकामांना तसेच अवैध कामांना गती देण्यात आली. मात्र जनतेच्या हिताच्या दृष्टीने ज्या समस्यांचे निराकरण व्हायला पाहिजे ते अजुनपर्यंत दिसत नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासन व प्रशासनाला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनातुन मागणी चे पत्र देण्यात आले. 1}यामध्ये अतिवृष्टीमुळे घर अंगावर पडुन मौजा पिंपळगाव भोसले येथील मृतक रामचंद्र गायधने यांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लाख रू आर्थिक मदत देण्यात यावी.2} एस सी, एस टी, एन टी, व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत खंड न पाडता ती वेळेवर नियमित देण्यात यावी. 3} रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित निधी तात्काळ देण्यात यावा. 4} अतिवृष्टी व पुरामुळे ग्रामीण भागांतील रस्त्यांची झालेली दैनावस्था तात्काळ दुरुस्त करावी. 5} श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम हि दरमहा नियमित देण्यात यावी. 6} शहरात निर्माण झालेल्या वार्डा वार्डातील रस्ते, नाल्या , विद्युत व पिण्याच्या पाण्याच्या समस्या तात्काळ दुर कराव्यात. 7} ब्रम्हपुरी शहरातील शिवाजी चौक व ख्रिस्तानंद चौक येथे तात्काळ वाहतुक सिग्नल ची व्यवस्था करावी. या सर्व मागण्या स्थानिक प्रशासन व शासनाने पुर्ण न केल्यास पक्ष्याच्या वतीने तिव्र आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी डॉ प्रेमलाल मेश्राम, लिलाधर वंजारी, अनिल कांबळे, सुशील( पिंटु) बन्सोड, एजुस गेडाम, जगदीश भष्याखेत्रे, अनंतकुमार मेश्राम, डी रामटेके, संतोष फुले, दिक्षित गजभिये आदि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.