आपल्या देशाच्या प्रजासत्ताक लोकशाहीत संविधानाने प्रत्येक नागरीकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. आपला तो घटनादत्त अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा योग्य वापर करून, आपला प्रतिनिधी निवडला पाहीजे. गेल्या काही वर्षापासून, आपली एकाही उमेदवाराला पसंती नसेल तर, यापैकी कोणीही नाही म्हणून "नोटा" ला मत देण्याचे सुचविण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणूकामध्ये मी असे बघीतले की, विधानसभेच्या निवडणूका असो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो किंवा ग्रामपंचायत निवडणूका असो. केव्हा केव्हा तर निवडणूक पत्रिकेवरील उमेद्वारापेक्षा नोटा (यापैकी एकही नाही.) या पर्यायाला जास्त मतदान झालेले दिसून येते आहे . परंतु सुज्ञ मतदारांना माझी विनम्र प्रार्थना आहे की, आपण नोटा ( यापैकी एकही नाही ) या पर्यायाला मतदान करून काय साध्य करीत आहात. आपण जर असा आततापायीपणा दाखवीत असाल तर आपल्या सारखा मूर्ख कुणीच नाही.विश्वरत्न महामानव डॉ आंबेडकर यांनी अथक महत्प्रयासातून लिहीलेल्या संविधानानुसार आपला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावीत नाही हेच आपल्या वागण्यावरून मग स्पष्ट होते. तेव्हा सुज्ञ मतदारांनो आपण आपला मतदानाचा बहुमोल हक्क कुण्यातरी एखाद्या उमेद्वाराला मतदान करूनच बजावू शकता. व आपण आपला अधिकार बजावलाच पाहीजे. आता आज सोमवार दि.३० जानेवारी रोजी आपल्या भागात अमरावती पदवीधर विधानपरिषद मतदार संघाची निवडणूक पार पडत आहे. तेव्हा या पाश्वभूमिवर मला एवढेच म्हणावे वाटते की, आपल्या विदर्भात पदवीधर युवकांच्या समस्या भरपूर आहेत. पदवीधरांना आज एवढे शिक्षण घेऊन बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पदवीधर असूनही त्यांना स्वावलंबी होता न आल्याने आज पदवीधर परावलंबी जीवनच जगत आहेत. येथील यापूर्वीच्या पदवीधर उमेद्वारांनी, पदवीधरांकरीता विधान परिषदेत, पदवीधरांची समस्या मांडून त्यांच्या नोकरी उद्योगाकरीता त्यांना रोजीरोटी मिळवून देण्याकरीता काहीही उपाययोजना केलेली नसल्याचे निर्विवाद सत्य आहे. शिवाय पदवीधरांशी साधा संपर्क, साधा संवादही ठेवलेला नाही. हे सुद्धा तेवढेच खरे आहे. त्यामुळे अमरावती विधानपरिषद मतदार संघातील प्रत्येक पदवीधर मतदार हा तसा ह्या निवडणूकीबाबत कमालीचा उदासीन असल्याचीच वस्तूस्थिती आहे. मात्र तरीही पदवीधरांनी या निवडणूकीवर बहिष्कार न टाकता किंवा यापैकी कुणीही नाही या नोटाच्या चुकीच्या पर्यायाचा विचार न करता, आपआपल्या पसंतीच्या उमेद्वाराला मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे. असे प्रतिपादन कारंजा येथील ज्येष्ठ साहित्यीक दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.