कारंजा(लाड) : आज "काम कमी आणि प्रसिद्धी हवी जास्त" अशी मानवी अभिलाषा होत असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी वृत्तपत्रे किंवा टि व्ही चॅनल्स ही प्रसिद्धीची माध्यमे होती.परंतु त्यामध्ये जाहिराती करीता पैसे मोजावे लागायचे.परंतु जगाने डिजीटल पाऊल पुढे टाकले आणि प्रत्येकाच्या हाती स्मार्ट मोबाईल फोन आले. मोबाईलद्वारे प्रसिद्धी करीता फेसबुक,व्टीटर,व्हॉट्सप, टेलिग्राम,मेसेज बॉक्स, निरनिराळे ग्रुप असी समाजमाध्यमाची पर्याय उपलब्ध झाली. त्यामुळे अगदी दिग्गज राजकिय नेते,व्हिआयपी,सेलिब्रेटी पासून तर सर्वसामान्यांना परस्परांशी जणू चढाओढ करण्याचेच समाजमाध्यम मिळाले.
त्यामुळे क्षुल्लक गोष्टींनाही मोफत प्रसिद्धी मिळविण्याचा मार्ग सहजरित्या उपलब्ध झाला. एखादा सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,राजकिय कार्यक्रम असो की निवडणूका असो. विवाह समारंभ असो की सत्कार समारंभ.एकमेकांना निमंत्रण देण्यापासून तर कार्यक्रम कसा संपन्न झाला ? त्यामध्ये आपले योगदान किती ? आपला सत्कार किती मोठा झाला ? याचे शेकडो फोटो,कित्येक व्हिडीओ.त्यावर मार्मिक विश्लेषण सर्वकाही समाज माध्यमावर फुकटामध्ये प्रसिद्ध करण्याची लोकांना सवय जडली.
त्यांच्या या सवयीचा परिणाम इतर जाहिरात माध्यमांवर प्रकर्षाने पडू लागला.आणि त्याचा परिणाम म्हणजे मोबाईल सारख्या समाजमाध्यमांवर फुकटफाकट प्रसिद्धी मिळविणाऱ्या प्रसिद्धी पिसाटांना सर्व काही फुकटच मिळायला हवे असेच आता वाटू लागले. त्यामुळे या फुकट्या मंडळीचा वृत्तपत्रामधून सुद्धा त्यांच्या दानशूर समाजकार्याच्या प्रसिद्धीच्या जाहिराती फुकटातच मिळाव्या असा प्रयत्न ते करू लागले आहेत.
यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की, मोबाईलच्या समाजमाध्यमावर तुम्ही काहीही खरेखोटे टाकले तर ते खपवून घेतले जाते. परंतु वृत्तपत्रे म्हणजे प्रिन्ट मिडिया असते. वृत्तपत्रांची (प्रिन्ट मिडीयाची ) एक विश्वासार्हता आहे. त्यामुळे वृत्तपत्रे पुराव्या शिवाय तुमची जाहिरात करीत नाहीत.व मोफत तर अजिबातच नाही.कारण पत्रकारीता ही समाजसेवा असली तरी सुध्दा वृत्तपत्रे छापायला पैशाची गरज असते.वृत्तपत्र काढायचं म्हटलं म्हणजे त्याला कंपोझिंग (अक्षरजोडणी),पेपर सेटींग,कागद,प्रिन्टीग व वितरण अशा गोष्टी लागतात. व त्याकरीता संपादकाला आर्थिक झळा सोसाव्या लागतात.शिवाय जे वार्ताहर असतात त्यांना जीवावर उदार होऊन,स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, समाजाशी समरस होऊन बातम्या संकलीत कराव्या लागतात. आणि एवढे सर्व करून तुम्हाला प्रसिद्धी मिळवून द्यावी लागत असते. पत्रकाराला सुद्धा कुटूंब,घरदार असते.आणि त्यांना जगविण्यासाठी पैशाची गरज असते.परंतु फुकट प्रसिद्धी मिळवू इच्छीणार्यांना त्याचं काहीही सोयरसुतकंच नसतं.आपण जी जाहीरात छापून घेतो आहे त्याचे त्यांना भानचं नसतं.आजकाल व्हॉटसप / फेसबुकवर त्यांना मोफत वृत्तपत्रे वाचायला मिळतात.किंवा ईपेपर सुद्धा मिळतात. परंतु ह्या वृत्तपत्रामध्ये तुमच्या जाहिराती तुम्हाला फुकट छापून मिळाव्या ही भावना तुम्ही ठेवणे हे चुकीचे आहे. व ही चूक तुम्ही लक्षात घेतली.व लघुपत्रकारांना वेळोवेळी तुमच्या जाहिरातीचा मोबदला दिला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा त्याचे समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही.त्याकरीता "प्रसिद्धी तर हवी ते देखील मोफत मध्ये" ही भावना चुकीची असल्याचे,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले आहे.