चंद्रपूर, दि. 17 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागांतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या सहाय्याने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना इस्राईलमध्ये जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
इस्राईलमधील होमबेस केअरगिवर या पदासाठी 10 वी उत्तीर्ण व हेल्थ सेक्टरमधील 990 तासांचा शासन मान्यताप्राप्त कोर्स केलेले, जीडीए, ए.एन.एम, जी.एन.एम. बी.एससी नर्सिंग, फिजीओथेरपी आदी शिक्षण असणारे, 25 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार प्राप्त आहेत. सदर पदाकरीता महिलांना प्राधान्य राहील. उमेदवारांना इंग्रजीमध्ये संभाषण करता येणे आवश्यक आहे. सदर पदाकरीता 1 लाख 30 हजार मासिक मानधन असणार आहे.
https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून युवकांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करुन जागतिक स्तरावर उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.