अकोला:- अकोला जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळा बंद करण्याचा डाव शासनाचा असून त्या विरोधात शिक्षण बचाव समन्वय समितीच्या लढ्या मध्ये विधानसभेत प्रश्न उपस्थित करून संघर्ष करू. शासनाने न ऐकल्यास रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी शेवटपर्यंत शिक्षण समन्वय समितीच्या संघर्षात
शेवटपर्यंत लढा देत राहण्याचे वचन दोन्ही आमदार महोदयाच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षक आमदार एडवोकेट किरण सरनाईक यांनी शिक्षन बचाव समन्वय समिती अकोलाच्या वतीने आयोजित माऊट कारमेल शाळेच्या आवारातील सभागृहामध्ये आढावा सभेला संबोधताना केले.
शिक्षण बचाव समन्वय समिती च्या कामाची दखल शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांनी घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला शुक्रवार दिनांक 7/6/2024 रोजी सकाळी 12 वाजता माऊंट कारमेल हायस्कूल,अकोला येथे बंद होणाऱ्या सरकारी शाळा व कमी पट संख्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होत . या बैठकीला पदवीधर आमदार धीरज लीगाडे, शिक्षक आमदार किरण सरनाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभापती माया नाईक,सुरज मेश्राम ,प्रशांत गावंडे ,विजय कौसल ,दिनेश काठोके , भाईप्रदीप देशमुख , समाजसेवक गजानन हरणे,
राजेश देशमुख ,श्रीमती बोरकर नवसागरे,दीपक बिरकडं ,
जयदीप सोनखासकर आदी अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील तसेच अमरावती विभागासह महाराष्ट्रातील बंद पडणाऱ्या शाळा सुरू ठेवण्यासाठी शासनासोबत विविध स्तरावर समन्वय करण्याचा निर्णय घेण्यात आला आमदार महोदय विधानसभा विधान परिषदेत तर शिक्षण समन्वय समिती चे पदाधिकारी जनतेत जाऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहे. जनजागृती, संघटन, संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारावर पुढील जनआंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. या आढावा सभेचे सूत्र संचलन गोपाल सुरे तर आभार प्रदर्शन जयदीप सोनकासकर यांनी केले. यावेळी अकोला जिल्ह्यातील बंद होऊ घातलेल्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण समितीचे अध्यक्ष, सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणारे अनेक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....