श्रीराम मंदीर देवस्थान कमिटी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा कमिटी यांच्या द्वारे दिनांक 30 मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चैत्र नवरात्र उत्सावा निमित्त श्रीराम मंदिर देवस्थान वरोरा येथे दहा दिवस व्याख्यान मालाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 30 मार्च रोजी आयोजित केलेल्या या भव्यदिव्य शोभायात्रेत आकर्षक झाकी, देखावे, भजन मंडळी, मल्लखांब, हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे वरोरा शहरा त निघणाऱ्या या भव्य दिव्य शोभायात्रे विविध समाजांच्या तसेच हिंदू संघटनेच्या नागरिकांचा सहभाग राहणार आहे तसेच अनेक संघटनामार्फत चौका चौकात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहे . या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ श्रीराम मंदीर देवस्थान येथून निघणार असून, ती वीर सावरकर चौक, महात्मा ज्योतीबा फुले चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नेहरू चौक, मित्र चौक,डोंगरावर चौक, जयभारतीय चौक असे मार्गक्रमण करीत श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा येथे ही शोभायात्रा पोहचणार आहे. अशी रूपरेषा या शोभायात्रेची असणार आहे. तरी या भव्य शोभायात्रेचा सर्व वरोरा वासियांना तसेच सर्व बाहेरील जनतेनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम मंदिर कमिटीचे अध्यक्ष मुकुल सायंकार श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती चे अध्यक्ष - डॉ.राजेंद्र ढवस