कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम शेलुवाडा येथील, चौर्या महादेव संस्थान सभागृह शेलुवाडा ता. कारंजा येथे, आदर्श जयभारत सेवाभावी संस्था (र.न. एफ 13420) शेलुवाडा या सामाजिक संस्थेकडून, मंगळवार दि . 27 सप्टेंबर 2022 रोजी, सकाळी 09:00 ते 12:00 वाजेपर्यंत,चि.ओमराजे ज्ञानेश्वर गरड ह्या बाळाच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त, 100% निःशुल्क मोफत "भव्य रोगनिदान शिबीर आयोजीत करण्यात आलेले असून शिबीरामध्ये मोफत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व औषध वितरण करण्यात येईल. याप्रसंगी अकोला येथील अस्थिरोग तज्ञ (हाडांचे आणि जोडारोपण तज्ञ)-डॉ. लोहाणा, अमरावती येथील जनरल फिजीशियन सर्जन डॉ राजुभाऊ कनेरकर, डॉ स्नेहल राऊळ, डॉ कलिम मिर्झा, डॉ ज्ञानदेवी गरड, डॉ सुभाष ठाकरे, डॉ ज्ञानेश्वर गरड, डॉ कुंदन श्यामसुंदर, डॉ विलास मैंद, डॉ राजु देशमुख, डॉ आशिष सावजी, डॉ इम्तियाज लुलानिया (निसर्गोपचार तज्ञ / आयुर्वेदिक) इत्यादी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ञ उपस्थित राहून उपचार करतील तसेच महत्वाचे म्हणजे मणक्यांचे गॅप, जॉईन्टचे दुखणे, वातरोग, हातापायाला मुंग्या यणे, संधीवात, हाडासंबधीचे दुखणे, कॅल्शियम कमी होणे इत्यादी आजारांवर खात्रीशिर उपचार केल्या जाईल तरी पंचक्रोशीतील गोरगरीब गरजू रुग्नांनी मो नं 9822774358, या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपल्या नावाची नोंदणी करून, मंगळवार दि . 27 सप्टेबर 2022 रोजी सकाळी 09:00 ते 12:00 वाजेपर्यंत, वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड तथा कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख रोमिल लाठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचे मार्फत केले आहे.