कारंजा: दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.राजेंद्र पाटणी साहेब शुभ हस्ते कारंजा तालुक्यातील खालील गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे असून भाजपा पदाधिकारी व गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे.
तालुक्यातील गंगापूर येथे सकाळी 9 वाजता 2515 1238 अंतर्गत बजरंगबली मंदीर परिसरात सभामंडप बांधकाम करणेअंदाजित किंमत 10 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन रामनगर येथे सकाळी 9.30 वाजता 2515 अंतर्गत प्रभु पवार ते प्रकाश जाधव यांच्या घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता या कामाचे भूमिपूजन, सोमठाणा येथे 10.30 वाजता हनुमान मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये (आमदार निधीतील प्रस्तावित काम) या कामाचे भूमिपूजन,
दिघी येथे 11. वाजता 2515 1238 अंतर्गत हनुमान -महादेव मंदीर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 15 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन. उंबर्डा येथे 11.30 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत येथे दलित वस्ती मध्ये भवानी माता मंदिर ते मेसका माय पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, भवानी माता मंदिर ते बौद्ध विहार पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन,2515 अंतर्गत दिगांबर काळेकर ते राजू घोडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत 10लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन.वहीतखेड येथे दुपारी 12.30 वाजता 2515 1238 अंतर्गत हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणेअंदाजित किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन इत्यादि गावात भूमिपूजन संपन्न होत आहे. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले आहे.