तालुक्यातील लोहारा येथील अद्वैत सुनील मेश्राम वय (२) याचा ट्रॅक्टर वरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहिती नुसार लोहारा येथील मृतक बालकाचे मोठे वडील भोजराज मेश्राम हा नांगरणीचे काम करून घरी येत असताना घराजवळ त्याचा मुलगा विहान व मृतक पुतण्या अद्वैत खेळत होते. ट्रॅक्टर दिसताच ट्रॅक्टरवर बसण्यासाठी दोघेही धावल्याने भोजराज मेश्राम याने ट्रॅक्टर थांबवून त्याचा मुलगा विहान व लहान भावाचा मुलगा अद्वैत याला बसविले.
घराच्या पुढे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी ब्रेक दाबले असता अद्वैत याचा पुढे तोल गेला. तोंडाच्या बाजूने सिमेंट रोड वर पडल्याने अद्वैत याला गंभीर दुखापत झाली. लगेच त्याला वैरागड येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतुगंभीर दुखापत असल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर केले. आरमोरी येथील रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.