वाशिम, (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हयात 1 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयाच्या सर्वच तालुक्यात,शहरात, मोहल्लात,वार्डात, गावखेडयात मोठया प्रमाणात मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकीमध्ये मोठया संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे.जिल्हयात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी.हा उत्सव शांततेने पार पडावा.कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार 1 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण वाशिम व रिसोड शहरातील मद्यविक्रीची परवाना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकाच्या नावे असलेला परवाना मुंबई दारुबंदी कायद्याअंतर्गत रद्द करण्यात येईल. असेही या आदेशात नमूद केले आहे.