कारंजा :- कारंजा येथील वैभवात भर घालणाऱ्या चार वेसी पैकी, महत्वाची व शहरात मध्यवर्ती बाजार पेठेत असलेल्या, दिल्ली वेसीचे काम लवकरच सुरू होणार आहे. (सध्या काही वर्षापासून ही दिल्ली वेस रहदारी करीता बंद करण्यात आलेली आहे . त्यामुळे कि. न. महाविद्यालयात जाणा ऱ्या विद्यार्थांना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जाणार्यांचे हाल होत आहे. हे विशेष.) पुरातत्व विभागाने या कामी त्वरीत काम सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.या कामा करिता आमदार राजेन्द्र पाटणी हे विशेष लक्ष देऊन होते. या कामा करिता पुरातत्व विभागाने काम करण्याच्या दृष्टीने वेस आणि परिसर यापूर्वीच ताब्यात घेतला होता .त्यामुळे नागरिकांनी त्वरीत काम करण्याची मागणी आमदार राजेन्द्र पाटणी यांनी केली होती आणि आमदार राजेंद्र पाटणी सुद्धा सतत या बाबीचा पाठपुरावा करीत होते त्यामुळे आता या कामाकरिता राज्य सरकार आणि पुरातत्व विभागातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कारंजा शहरातील वेसीच्या कामासाठी या कामास गती देण्यासाठी ,निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच असतील. असे स्पष्ट करतांना आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगीतले की,
या कामाचे आदेश दिं 23 /3/2019 अन्वये कामाचे आदेश कंत्राटदारास देण्यात आले होते.परंतु वेसीची त्यावेळी पुरातत्व विभागाने स्थिती बघता संपूर्ण वेस उतरवून त्याची पुनर्उभारणी करणे आवश्यक असल्याने काम थांबवून वेसीच्या जतन दुरुस्तीचे नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे ठरवले होते . दिल्ली वेस कारंजा ता. कारंजा जिल्हा वाशिम या राज्य संरक्षीत स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अक्षरी चार कोटी तीन लक्ष चौतीस हजार चारशे आठ फक्त रकमेच्या सविस्तर अंदाज पत्रकास प्रशासकीय मंजुरात मिळावी म्हणून संचालकाने उपसचिव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ,मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविले होते. आता मात्र कामास मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे वतीने त्यांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .