कारंजा : ग्रामीण भागातून येणारे वाशिम जिल्ह्यातील हाडाचे शेतकरीनेते तथा सहकार क्षेत्रातील दिग्गज जाणकार असणारे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी कामरगाव येथे जावून त्यांचे चाहते, ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजाचे पदाधिकारी तथा ग्रामिण पत्रकार हिंमत मोहकार आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी वाढदिवसानिमित्ताने, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करीत त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात. सहकार क्षेत्रात कार्यरत असतांना आपल्या आयुष्यात श्रीधर पाटील कानकिरड यांनी शेतकरी असो वा उद्योजक.श्रीमंत असो वा तळागाळातील गोरगरीब. अशा सर्वांना प्रांजळ मनाने हवी ती मदत,पाहीजे ते मार्गदर्शन सहकार्य करीत, केवळ माणसं जोडण्याच काम केलं, त्यामुळे अकोला-वाशिम जिल्ह्यात फार मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांच्या भेटीला हजारो नागरीक कामरगाव, बांबर्डा,कारंजा येथे येत होते.