सावली वनपरिक्षेत्रांतर्गत उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील राजोली फाल येथे सहा महिण्यांपूर्वी दोन वाघांची शिकार प्रकरणात आणखी पाच जणांना सावली वनविभागाने गुवाहाटी येथून अटक केली आहे.त्यांना वनविभागाने न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आजा आठ आरोपी झाले आहेत. अर्जूनसिंग प्यारेसिंग कुरडीया (३९), ओमप्रकाश कुरडीया (४५), रामदास गोपी कुरडीया (४०), मायादेवी कुरडीया (५०), राजवती ओमप्रकाश कुरडीया (४०) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी परिसरातील वाघाची शिकार झाली होती. दरम्यान, गुवाहाटी येथे वाघाच्या कातड्यासह आरोपींना पकडल्यानंतर या शिकारी टोळीने सावली तालुक्यातील राजोली फॉल येथील दोन वाघाची शिकार केल्याचे समोर आले होते. त्याआधारावर पूर्वीच कारागृहात असलेल्या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर एका महिलेला अटक केली होती. आता आणखी पाच जणांना गुवाहाटी येथून अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या आठ झाली आहे.