राजकारणाच स्थर इतकं खालावलेल आहे की फक्त एकमेकावर आरोप प्रत्यारोप जात पात धर्म द्वेष याच्यातच अडकलेले आहे असे वाटत आहे जनता किंवा मतदार पहिल्यासारखी खुळे राहिलेले नाही त्यांना सर्व समजत आहे आणि हे समजत आहे की फक्त जो तो आपल्या सोयीचे राजकारण करत आहे सोयीचे राजकारण करताना धर्म जात पात द्वेष याचा एकमेव आधार त्यांना घ्यावासा वाटतो जनतेला आता तुमच्या वक्तव्यान कंटाळा आलेला आहे कारण हे सतत असे ऐकून जनतेचे कान पिकलेले आहेत कृपया शेतकऱ्याबद्दल शेतमालाला भाव विकासात्मक दृष्टी महागाई कशी कमी होणार महिलांना कशी सुरक्षितता प्रदान करण्यात येणार बेरोजगारी शिक्षणाचा बट्ट्याबोळ शिक्षणही महाग होत चालले गुन्हेगारीवर कसा आळा बसणार शेतकऱ्यांची आत्महत्या कशी थांबणार सांगायचं तात्पर्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही आणि आपण निवडून आल्यानंतर कोणते विकासात्मक काम करणार याची उजळणी जनतेसमोर मांडायला पाहिजे जनतेला तुमच्या सोयीचे राजकारण आरोप प्रत्यारोप शी काही घेणेदेणे नाही
दुसऱ्या वर आरोप करताना आपण आपली पूर्ण बाजू तपासून पहायला पाहिजे म्हणजे काल तुमच्यावर ही पाळी नाही आली पाहिजे अरे हे किती खोटं बोलतात तेव्हा बोलताना विचार करायला हवा
आता सध्याची परिस्थिती पाहता मतदार पण गोंधळलेले आहेत आणि आता तर मतदारांची खरी परीक्षा आहे कारण कोणाला मत द्यावं कोणाला नाही आपण कोणाला दिलं तर काल तो पक्ष बदलणार का जनतेसाठी कोणते कार्य केले याबद्दल आता पूर्ण आकलन मतदाराला करावे लागणार आणि फार विचार करून मतदान करावे लागेल म्हणून म्हणतो यावेळेस आता खरी परीक्षा मतदारांची आहे या परीक्षेत कोणाची खुर्ची खतरेमे राहणार काही सांगता येत नाही खुर्चीच खतरे मे राहणार बाकी काही खतरेमे नाही