वाशीम : व्हॉइस ऑफ मीडियाच्या अमळनेर येथे १३ व १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या केडर कॅम्पला पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया वाशीमचे जिल्हाध्यक्ष भागवत राव मापारी यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणारा पत्रकारांचा केडर कॅम्प हा व्हॉइस ऑफ मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. अमळनेर येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात नेतृत्व विकास कार्यशाळा मार्गदर्शन आणि नेटवर्किंग या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय, आधुनिक पत्रकारिता आणि संपादन कौशल्याच्या विविध अंगांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्थानिक ते राज्यस्तरावरील संघटन मजबूत करण्यासाठी प्रभावी योजना सांगितल्या जाणार आहेत. सोशल मीडिया, फॅक्ट चेकिंग, डिजिटल सेफ्टी, प्रभावी संवाद आणि टीम बिल्डिंग याबाबतही सखोल माहिती मिळणार आहे, तरी वाशीम जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी प्रशिक्षण शिबिराला जाण्यासाठी तात्काळ नोंदणी करून आपली उपस्थितीची खात्री व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन भागवत राव मापारी यांनी केले आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक तसेच केडर कॅम्पमध्ये पत्रकारांचे नेतृत्व आणि पत्रकाराचा विकास तसेच पत्रकारांचे अधिकार या विषयावर कार्यशाळा होत असून तज्ज्ञ आणि विविध विषयाचे ज्ञान असणारे नेतृत्व या ठिकाणी लाभणार आहे. हा केडर कॅम्प मंगळगृह मंदिर अमळनेर जिला जळगाव या ठिकाणी होत असून दिनांक, १३ आणि १४ सप्टेंबर २०२५ होत आहे.
तरी जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या केडर कॅम्प मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी केले असल्याचे व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वैशाली चवरे यांनी कळवीले आहे.