कारंजा : स्थानिक श्री साईबाबा वाटिका मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित साध्वी हभप चित्रादिदी वाकडे ( माऊली ) यांच्या श्रीमदभागवतकथा सप्ताहानिमित्त,श्री साईबाबा वाटिका मंदिर येथे दररोज लाखो कारंजेकर साईभक्तांची बहुसंख्येने मांदियाळी बघायला मिळत असून श्री साईबाबा वाटिका मंदिरामुळे, बालाजी नगरी भाग -२ ला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे प्रत्यक्षदर्शी संजय कडोळे यांनी टिपले आहे.श्री साईबाबा वाटिका मंदिराचे निष्काम कर्मयोगी अध्यक्ष किशोर धाकतोड व सर्वच विश्वस्थ मंडळीच्या अत्यंत प्रामाणिक,निःस्वार्थी,चोख,निव्वळ सेवाभावी,हजरजवाबी व पारदर्शी कारभारामुळे लवकरच श्री साईबाबा मंदिर हे नावारूपास येणार असल्याचे विधान स्वतः संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग तालूका प्रमुख संजय कडोळे यांनी केले आहे.मंदिरात दररोज समाजप्रबोधनाचे उत्कृष्ट कार्यक्रम होत असून कार्यक्रमाला अखिल भारतातील सुप्रसिध्द संत आणि पंचमुखी हनुमान आश्रम आखाडा त्र्यंबकेश्वर रोड इंदोरच्या प्रमुख ब्रम्हचारिणी साध्वी महंत भगवतदास त्यागी श्री श्री विजयादेवी यांची उपस्थिती लाभलेली आहे.
नुकतेच श्री साईबाबा वाटिका मंदिरात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे परमभक्त, श्री सत्यपाल महाराजांचे लाडके गोपाल महाराज यांचे सुपूत्र तथा सप्तखंजेरी वर प्रबोधन करणारे बालकिर्तनकार शिष्य वैभव महाराज ठिलोरकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला असतांना, कार्यक्रमाचा मंडप अक्षरश : लाखो रसिक श्रोत्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी आपल्या किर्तनरूपी प्रबोधनातून बोलतांना वैभव महाराज ठिलोरकर म्हणाले, " आजकाल आईवडिलांच्या व्यस्ततेमुळे आपल्या मुलांबाळांकडे दुर्लक्ष्य होत चालले असल्यामुळे आजची तरुणाई निरनिराळ्या वाईट व्यसनांच्या आहारी भरकटत आहे . तेव्हा सावध होऊन आईवडिलांनी आपल्या मुलां साठी वेळ काढून त्यांचेवर चांगले संस्कार केले पाहिजे. आज गांजा दारू तंबाकू सारखी दुर्व्यसने तर आहेतच पण त्यापेक्षाही मोबाईलचे व्यसन जास्तच घातक ठरत आहे. तेव्हा आपली मुले रात्रदिवस मोबाईलवर काय चित्र विचित्र बघतात त्याकडेही मातापित्यानी लक्ष्य देण्याचा सल्ला देऊन तरुणांनी छत्रपती शिवराय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेमहाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा तर मुलींनी जिजाऊ-सावित्री-रमाई यांचा आदर्श घ्यावा असे वैभव महाराज ठिलोरकर यांनी सुचवले. असे वृत्त श्री साईबाबा वाटिका मंदिर कडून अध्यक्ष किशोर धाकतोड यांनी, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .