ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगाव येथील शेतकरी राजेश्वर नारायण मगरे हे दरवर्षी शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेऊन लाखो रुपयाचे उत्पन्न काढून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण करीत आहेत. तसेच शेतीसह सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे कार्य वाखण्या जोगे आहेत.
एका सामान्य गरीब कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी आज पर्यंत आपल्या शेतामध्ये केळी,टरबूज, काकडी असे नवनवीन प्रयोग राबवून शेतीची मशागत करून लाखो रुपयांचे उत्पन्न काढले व त्यांच्या शेतामध्ये बारमाही भाजीपाल्याचे पीक घेतला जातो. त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पॅक हाऊस,शेततळे, अशा विविध योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे.
जिल्हास्तरावरील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांना सण 2018-19 व सन 2019 - 20 मध्ये त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच त्यांना तालुका स्तरावर देखील याबाबत पुरस्कार प्राप्त झालेली आहे आनंदवन वरोरा येथे डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे शेतीसह 1999 पासून त्यांचा दुग्ध व्यवसाय सुद्धा आजपर्यंत सुरू आहे पशुधन विकास मध्ये सुद्धा दुग्धव्यवसायामध्ये तालुकास्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. शेतीसह व दुग्ध व्यवसायासह त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा आज पर्यंत विविध पदे भूषवली आहेत.यामध्ये गोगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पद,गांगलवाडी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष पद, गोगाव सेवा सहकारी संस्था अध्यक्ष दहा वर्ष,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आठ वर्ष, तालुका दक्षता समिती अध्यक्ष दहा वर्ष,मेंडकी येथील गणेश राईस मिल चे विद्यमान अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचे बरडकिन्ही चे सदस्य, व्यसन मुक्तीचे पुरस्कर्ते असे विविध पद भूषवून त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर व गरीब परिस्थितीतून पंचवीस एकर शेती उभी केली.आज थोरला मुलगा देवेंद्र व धाकटा रवींद्र यांच्यासोबत आजही ते शेतामध्ये श्रम करतात.यावर्षी मिरची, टमाटर, वांगे, तसेच उन्हाळी धान्य पिक हे पिके लावलेले असून मिरचीचे उत्पन्न काढून ते आरमोरी-गडचिरोली बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठविले जातात.
अशाप्रकारे सर्वसामान्यांना लाजवेल असे कार्य एका गरीब कुटुंबातून आलेल्या राजेश्वरजी मगरे यांनी करून दाखवले आहे त्यांच्या या कार्याची कुठेतरी दखल व्हावी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून पुन्हा उत्पादनामध्ये भर कशी पडेल व जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सहकार्य करावे.