अकोल- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेची ऐतिहासिक परंपरा साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल. मराठी भाषा आणि संस्कृतीशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतील असे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सनातन धर्मसभा पुस्तकालयात आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते. वाचनालय कार्यकारणी सदस्य डॉ. मिलिंद निवाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. डॉ. सत्यनारायण बाहेती, अड. पप्पू मोरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे ग्रंथालयाचे सक्षमीकरण होणार आहे. ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ होईल त्याचबरोबर उच्च दर्जाची ग्रंथ संपदा वाचनालयात असेल असे प्रतिपादन डॉ. सत्यनारायण बाहेती यांनी केले.
मराठी भाषा संवर्धनासाठी योगदान दिल्या बद्दल प्रा. बबनराव कानकिरड व डॉ. सत्यनारायण बाहेती यांचा वाचनालयाचे वतीने डॉ.मिलिंद निवाणे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मराठी राजभाषा सप्ताहानिमित्त सनातन धर्मसभा पुस्तकालयाचे वतीने वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शनी आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल ऐश्वर्या पाटोळे यांनी केले.
सर्वश्री राजाभाऊ गायकवाड, वेंकट स्वामी मागले, विठ्ठल मानकर, राधेश्याम शर्मा, विकास कोकाटे, एडवोकेट पप्पू मोरवाल,अजय शर्मा, सुनील दिवनाले, विकास रामटेके, शशिकांत मोडक, अरुण कुमार बोरकर, अभय अलमेलकर, दिनेश ठाकूर, किशोर साळकुटे,अजय रोडे, मनोज शुक्ला, गणेश शेरकर यांचे सह अनेक मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटीबद्ध राहण्याचे आवाहन या प्रसंगी वाचनालयाचे वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रंथपाल आरती पोतदार, लिपीक देवेंद्र राठोड, सेवक सुरेश अग्रवाल यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....