चंद्रपूर :- आज सकाळी अचानक अनेकांच्या मोबाईल वर एक वेगळाच इमर्जन्सी अलर्ट Emergency Alert on Mobile वाजला, याने अनेक मोबाईल धारक संभ्रमात पडले, हा कसला अलर्ट ??
आणि मोबाईल च्या नियमित रिंगटोन पेक्षा किंव्हा न ऐकलेला असा वेगळाच अलर्ट टोन Mobile Alet Tone होता, नंतर अगदी 10 ते 15 मिनिटानंतर पुन्हा एक संदेश मोबाईलवर आला त्यात “Emergency Severe Alert हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी ईशारा आहे” असे लिहिले होते.
सदर अलर्ट नैसर्गिक आपत्ती Natural Disaster उदभवल्यावेळी जसे भूकंप, पूर परिस्थिती, किंव्हा आपदा ची चाचणी असल्याचे बोलले जात आहे.
परंतु याबाबत अजूनही सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने तसेच दूरसंचार विभागाने कुठलीही माहिती प्रसारित केलेली नाही.