कारंजा (लाड) : कारंजा विधानसभा मतदार संघाचे एकेकळीचे माजी आमदार, राज्यमंत्री,वाशिम लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि वाशिम अकोला जिल्ह्यातील एकेकाळीचे काँग्रेसमधील प्रभावशाली दिग्गज नेते व वाशिम जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व असलेले असलेले,भाऊसाहेब अनंतराव देशमुख व त्यांचे पुत्र युवा नेते नकुल देशमुख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह दि.१४ मार्च रोजी,भाजपमध्ये मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन,प्रदेश सरचिटणीस रणवीर,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी,माजी आमदार विजयराव जाधव इ.प्रमुख नेत्यांच्याउपस्थितीमध्ये भाजपा पक्षात आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह जाहीर झाला.
भाऊसाहेब अनंतराव देशमुख तथा युवानेते नकुल देशमुख,चैतन्यभैय्या देशमुख यांच्या सोबत वाशिम जिल्ह्यातील जिल्हा जनविकास आघाडी व भाऊसाहेबांच्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांनी सुद्धा मोठया प्रमाणात प्रवेश केला आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कारंजा विधानसभा मतदार संघातील त्यांच्या नव्या जुन्या चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचे व उत्साहाचे नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत असून,लवकरच कारंजा येथे त्यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागताचा कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त त्यांच्या चाहत्यांकडून सा.करंजमहात्म्य परिवाराला मिळाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.