सदर घटनेतील आरोपीने अल्पवयीन मुलींना शाळेत मोठे साहेब येणार आहेत वह्या देणार आहेत असे सांगून शाळेत तीन मुलींना बोलवले . तेथे आरोपी हा एकटाच असल्याने दोन मुली तिथून परत आले. त्यानंतर परत आरोपी हा पिडीत मुलगी व अन्य पीडिता हीचे हात पकडुन त्यांना त्यांचे घरी संडासकडे नेऊन अत्याचार केला. यावरून फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी विरुध्द अपराध क्रमांक ४५५/२०२३ नुसार भांदवी कलम ३५४ (अ) , ३५४ (ड) , पॉक्सो कलम ८,१२ तसेच ॲट्रोसीटी ॲक्ट चे कलम ३(१),(w) (I),(II) , ३(२)(v) , ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपी नामे कैलाश झोडे वय: ४० वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.