कारंजा (लाड) : आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ब्रह्मकुमारी राजयोग केंद्र प्रभू मिलन भवन कारंजा येथे राज योगिनी ब्रह्मकुमारी मालती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 8 मार्च 2025 शनिवार रोजी असंख्य ब्रम्हकुमारी महिला व ब्रम्हकुमार पुरुष परिवार यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी ब्रम्हकुमारी रिना बहन यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती केली. ब्रम्हकुमार प्रविण भाई यांनी आपल्या सुमधूर स्वरात गीतगायन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये असलेल्या चैतन्य मैत्र बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्काराने विशेष सन्मानित ब्रम्हकुमारी सौ.भारती बहन भोरे तथा कारंजा शहरातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ ब्रम्हकुमारी डॉ सोनाली बहन राऊत यांचा जागतिक महिला दिनानिमित्त ब्रम्हकुमारी मालतीदिदी यांचे मार्गदर्शनात त्यांचे व उपस्थित ब्रम्हकुमारी दिदींचे हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी सर्व उपस्थित स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला ब्रम्हकुमार प्रदिप भाई वानखडे यांचेसह ब्रम्हकुमारी परिवाराचे अनेक मंडळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ब्रम्हकुमारी नयना दिदी यांनी तर आभार प्रदर्शन ब्रम्हकुमार डॉ. निखीलभाई कटारीया यांनी केले. असे वृत्त ब्रम्हकुमारी परिवाराचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले .