प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार (आय ए एस)यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार (आय ए एस) हे आरमोरी येथे रूजू होताच त्यानी अल्पावधीतच विवीध सामजिक उपक्रम राबविले. विद्यार्थ्याना एका दिवसांत जातीचें प्रमाणपत्र देण्याचा त्याचा उपक्रमाची जिल्ह्यांत सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय गरजु ,निराधार, दिव्यांग व पात्र असूनही शासनाच्या योजनेपासून वंचित असलेल्या लोकांचा सर्व्हे करूण त्यांना अपंगांचे प्रमाणपत्र देण्यासोबतच त्यांच्या केसेस मंजुर केल्या. सामाजिक भावनेने त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीहरी माने समता युवा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक प्राचार्य अमरदीप मेश्राम, महेंद्र रामटेके, ॲड.अमित टेंभूर्णे, समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे, उपाध्यक्ष प्रविण रहाटे, सचिव अनुप रामटेके, सहसचिव मंगेश पाटील आदी उपस्थित होते.