कारंजा (लाड) : दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त,नगर पालिकेत अभियंता विजय घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होते.त्या करिता ते वाशिम येथून सकाळी ६:३० वाजता कारंजा येथे आले होते. व त्यांनी नगर पालिकेत राष्ट्रिय कार्यक्रमाला उपस्थित राहून, ध्वजारोहण सुद्धा केले. नंतर साईट व्हिजिट करण्याकरिता जात असल्याचे सांगून ते नगर पालिकेतून गेले होते. मात्र एक दिवस उलटल्यावर ही परत न आल्यामुळे कुटूंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ते कोठेही आढळून आले नाही. शिवाय त्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही त्यामुळे अखेर इंजीनिअर गौरव घुगरे यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन मध्ये वडील विजय घुगरे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.