अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मोरगाव येथील तलावाच्या जंगल परिसरात 14 मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली.
विशाल पुरुषोत्तम राऊत (२१, रा. मोरगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मनात आलेल्या नैराश्यापोटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेसंदर्भात प्रशांत पुरुषोत्तम राऊत (१९) यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार गोंडाणे करीत आहेत.