कलावंतानी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्यदिनाचे पूर्वसंध्येला एकदिवशीय धरणे आंदोलनात सहभागी व्हावे.
वाशिम(प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाकडून, "वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेच्या" इच्छुक लाभार्थ्यांची क्रूर थट्टा करण्यात येत असून,दररोज जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामिण खेड्यापाड्यावरून, समाज कल्याण जिल्हा परिषद वाशीमला येऊन वयोवृद्ध कलावंत, "आमच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली काय ? मिळाली असेल तर पात्र लाभार्थी यादी दाखवा ? मानधन केव्हा मिळणार ?" असे प्रश्न विचारत असतांना,त्यांना काहीतरी थातूरमातूर उत्तरं देवून त्यांची बोळवण केल्या जात आहे.परंतु सन २०२४-२५ ची ज्येष्ठ साहित्यीक कलाकारांची पात्र मानधन लाभार्थी मंजूर यादीच तयार झालेली नसल्याचे वास्तव पुढे आले.त्यामुळे आता गरजू वयोवृद्ध ज्येष्ठ साहित्यिक कलावंतानी,प्रत्येकांनी,थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकाराद्वारे रितसर लेखी तक्रार नोंदवून त्यांना सन २०२४-२५ च्या मंजूर लाभार्थी कलावंताची यादी,माहिती अधिकाराचा अर्ज करून मागून घ्यावी.व प्रशासनाकडून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध दि.१३ ऑगष्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने होणाऱ्या "क्रांतिकारी धरणे आंदोलनात" बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन "विदर्भ लोककलावंत संघटना" कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.या संदर्भात अधिक वृत्त देतांना त्यांनी सांगीतले की,दरवर्षी शासनाकडून "राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेसाठी" विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येतात.त्यानुसार जिल्ह्यातील वृद्ध साहित्यीक व ज्येष्ठ कलाकाराकडून प्रत्येक पंचायत समिती मार्फत किंवा थेट जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडेच प्रस्ताव सादर केले जात असतात. सदरहू प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी पालकमंत्री यांचेकडून,पालकमंत्र्यानी नियुक्त केलेल्या निमशासकीय सदस्यांची "वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती" कार्यरत असते. या समितीने निवडलेल्या पात्र कलावंताची मंजूर यादी सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईला पाठविल्यानंतर,पात्र कलावंताना थेट हस्तांतरण प्रणाली ( डिबीटी ) द्वारे त्यांच्या बँकखात्यात मानधन दिल्या जाते.करीता मागील वर्षी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री ना.संजयभाऊ राठोड यांनी पंकजपाल महाराज राठोड यांच्या अध्यक्षतेखाली "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे" गठन केलेले होते. पुढे विधानसभा निवडणूकांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुक वृद्ध साहित्यीक कलावंताच्या कलेचे सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखती,समाज कल्याण कार्यालय सभागृह नालंदानगर वाशिम येथे घेण्यात आले होते व समितीकडून पात्र कलावंताची निवड करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेला आठ नऊ महिने कालावधी झालेला असतांनाही अद्यापपर्यंत "वृद्ध साहित्यीक कलाकारांची पात्र यादीच" जिल्हा कार्यालयाकडून तयार झालेली नसल्याने, व प्रस्तावाला कायदेशीर मंजूरी मिळाली नसल्याने इच्छुक वयोवृद्ध कलाकारांची हेळसांड होत असल्यामुळे, प्रत्येक कलावंतानी वैयक्तिक स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती अधिकाराद्वारे तक्रार करावी व स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला दि. १३ ऑगष्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे विदर्भ लोककलावंत संघटनेकडून होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथ विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी वृद्ध साहित्यीक कलावंताना केले आहे.