अकोला-साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त साथी यदुनाथ थत्ते विचार जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने सामाजिक सद्भावना विचाराचा ठेवा घरोघरी पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन बबनराव कानकिरड यांनी केले.
राष्ट्रसेवा दल व साने गुरुजी वाचनालय यांचे संयुक्त विद्यमाने यदुनाथ थत्ते लिखित साने गुरुजी पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते .राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष एडवोकेट दिनकर बुंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वश्री अरविंद पाठक, कमलाकर दुर्गे ,डॉ. अशोक तायडे, डॉ.नागेश शिरसाठ ,प्रा.डाॅ. प्रवीण वाघमारे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती .
स्वतंत्रतासेनानी साने गुरुजी यांच्या 125 जयंती वर्षानिमित्त साथी यदुनाथ थत्ते विचार जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेसाठी, सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी साने गुरुजींच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी साने गुरुजींची धडपडणारी मुले महाराष्ट्रभर जनजागरण करत आहेत . साथी यदुनाथ थत्ते विचार जागर अभियान महाराष्ट्राचे कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे नांदेड ,देवदत्त परुळेकर सिंधुदुर्ग, सुविधा थत्ते मुंबई ,डॉ. जी. पी. पाटील अमेरिका ,अल्लाउद्दीन शेख रायगड ,संजय रेंदाळकर कोल्हापूर ,शिवाजी नाईकवाडी अहमदनगर, श्रीकांत लक्ष्मी शंकर पुणे, अलका एकबोटे नाशिक गोपाळ कोरडे अमरावती, बबनराव कानकिरड अकोला,प्रवीण वाणी मालेगाव दिनकर आदाटे सांगली ,एडवोकेट विजय दिवाण ठाणे, लता बंडगर उस्मानाबाद ,रवी सांगोलकर सोलापूर यांनी बलसागर भारतासाठी या विधायक कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. आज अकोल्यातील साने गुरूजी वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन साने गुरुजी वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती धबाले सरदार यांनी केले. आभार दर्शन विशाल बेंदरकर यांनी केले.