अकोला..
अकोला येथील दिमाखदार सोहळ्यात लोक आंदोलन न्यास चे जिल्हाध्यक्ष तथा वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी "राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद पुरस्कारा"ने सन्मानित
अखिल भारतीय मराठा सेवा संघ व डि. एम. के. सेवा मंडळ, महाराष्ट्र निर्भय बनो जन आंदोलन, राष्ट्रीय लोक आंदोलन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी 2025 रविवारला दुपारी तीन वाजता हॉटेल नैवेद्यम खडकी अकोला येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प संतवासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुदेव मंडळाचे प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, ह भ प शिवदास गाडेकर महाराज, डी एम के मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दादाराव पाथीकर, मराठायोद्धा राजेश देशमुख, अनिसचे शरद वानखडे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, समाजसेवक गजानन हरणे, मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, प्रा. विनायक धोरण , आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना व स्वामी विवेकानंद यांच्यावरील गीत सौ यूगेश्वरी हरणे यांनी गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले .

तसेच यावेळी कथक नृत्य श्रीलेखा पाटील परतवाडा यांनी सादर करून श्रोत्यांचे मनो जिंकले. यावेळी विविध क्षेत्रात सेवाभाव वृत्तीने सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद पुरस्कार सन्मानपत्र, गौरव चिन्ह ,शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्वामी विवेकानंद प्रेरणा पुरस्कार
संपादक सुधाकर चौधरी यांना दोन गुणगौरव करण्यात आला
सामाजिक कार्याच्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवुन सर्दैव न्याय देण्याची भुमिका जोपासत असलेले संपादक सुधाकर चौधरी
कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने हे पुरस्कार दिल्या गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादाराव पाथीकर यांनी तर उत्कृष्ट संचालन गजानन हरणे तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्णकांत वक्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनिल हरणे, प्रमोद धर्माळे, प्रभाकर चले , विजय भटकर, अनंत खेडकर, तसेच नैवेद्य हॉटेलचे कर्मचारी यांनी अथग परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली पाहुण्यांच्या ऊपस्थीतीत संपन्न झाले
व नंतर नाश्ता चहा पाण्याने आनंदात झाली. कार्यक्रम शांततेत उत्साहात पार पडला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....