कारंजा [लाड] -- आपले पोलिस बांधव व अधिकारी जनतेच्या संरक्षणासाठी तसेच कोणत्याही संकटाच्या काळात, घर-दार तहाण-भुक विसरून , ऊन-पाऊस- वरा झेलत सदैव जनतेच्या सेवेत कार्यरत तत्पर असतात. ज्या प्रमाणे पोलिस बांधव आपली काळजी घेतात त्याचप्रमाणे जनतेचे ही कर्तव्य आहे पोलिस बांधवांची काळजी घेणे आणि ह्या उदात्त दृष्टीकोनातूनच शहरातील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अब्दुल राजिक शेख व सेवाभावी एड. संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत बंदोबस्तासाठी अगदी सकाळपासून तैनात असलेल्या सर्व पोलीस वीरांना नास्त्याचे वाटप करुन मानवतेचा परिचय दिला. सर्व सामान्य जनतेसाठी विसर्जन मार्गावर नास्त्याची सोय केल्या जाते परंतु पोलिस बांधव विसर्जन मिरवणुकीत एकाच जागेवर तैनात असल्यामुळे व दुसऱ्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने अब्दुल राजिक शेख व एडड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी त्यांच्या क्षुधाशांती करीता नास्त्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर कोणताही पोलिस बांधव उपासी राहणार नाही याची दक्षता ही त्यांनी घेतली .
अब्दुल राजिक शेख व एड . संदेश जैन जिंतुरकर ह्यांच्या ह्या अभिनव उपक्रमामुळे पोलिस बांधव व जनता ह्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे सहृदय आभार मानले .
त्यांच्या ह्या उपक्रमाला सैय्यद जावेद, इमरान शेख , रिजवान खांन ह्यांनी ही हातभार लावला. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .