चंद्रपूर : चिमूर तिलुक्यातील शंकरपूर येथील एका 36 वर्षीय नराधमाने दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर शुक्रवारी (24 जून) ला सायंकाळच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी नराधम राजीक उर्फ काल्या (वय 36) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिस सुत्रानुसार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे पीडित मुलीच्या आजोबाचा देशी दारूच्या भट्टिवर नाश्त्याची छोटीसीची दुकान आहे. या दूकानात लागणारा माल ह्या घरून बनवून विकल्या जातात. त्यामुळे शुक्रवारी (24 जून) ला पिडीत मुलगी आईने उकडून दिलेले अंडे घेऊन आजोबाच्या देशीभट्टीला लागून असलेल्या दूकानवर गेली होती. दारू ढोकसण्यासाठी तिथे आरोपी नराधम नामे राजीक उर्फ काल्या (वय 36) हा दारू पीत होता.
दूकानमध्ये अंडे दिल्यानंतर। पिढीत मुलगी मुलगी घरी एकटी जाताना होती. दरम्यान एकटी जाताना पाहून तो तिच्या मागे दुचाकीने आला. तिला घरी सोडून देण्याचा बहाना करून गाडीवर घेऊन गेला. रस्त्यात असलेल्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जनस्थळी घेऊन गेला व तिच्यावर अमानुष अत्याचार केला. पिढीत मुलीने आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या आई तिला सोबत घेऊन पोलीस चौकी गाठण्यासाठी निघाली असता वाटेतच आरोपी नराधम दिसला असता पिढीत मुलीच्या आईने त्याची कॉलर धरून पोलीस चौकी कडे नेण्याचा प्रयत्न केला असता तो हिसका मारून पळून गेला. त्यानंतल पिढीतेच्या आईने लगेच पोलीस चौकी गाठून घटनेची हकीगत सांगितली. पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को नुसार गुन्हा दाखल केला व अटक केली आहे.