ब्रम्हपुरी शहरात आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट ला युथ क्लब ब्रम्हपुरी द्वारे एक शाम वतन के नाम या देशभक्तीपर नृत्य स्पर्धा व गायन सादरीकरणाचा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी हॉल इथे करण्यात आले होते.या देशभक्तीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कला-गुणांना वाव देणे तसेच देशाच्या स्वातंत्र्याचा महत्व,इतिहास विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्ह्याचे माजी जि. प.सदस्य मा. प्रमोदभाऊ चिमूरकर यांचे हस्ते पार पडले .त्यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात आजचे विद्यार्थी उद्याच देशाचं भविष्य असून त्यांना देशाच्या स्वातंत्र्य, देशभक्त स्वातंत्र्य सैनिक यांच्या विषयी माहिती होण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक असून अशा सुदंर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आयोजकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मा.देवेश कांबळे सर हे तर सह उदघाटक म्हणून नगर परिषद चे मुख्याधिकारी मा.आर्शिया जुही उपस्थित होते.या नृत्य स्पर्धेत विविध शाळेच्या विद्यार्थी व क्लब ने सहभाग घेतला.

त्यामध्ये समूह नृत्य प्रकारात ब्रम्हपुरी पब्लिक स्कुल ने प्रथम ,स्टेम पोदार स्कुल ब्रम्हपुरी द्वितीय तर पलक ऍण्ड ग्रुप ने तृतीय क्रमांक मिळवला. एकल नृत्यामध्ये अभिज्ञा परकरवार व सांज लोखंडे यांनी संयुक्त तृतीय क्रमांक, निखिल पारधी याने द्वितीय तर आरोही ठाकरे हिने प्रथम क्रमांक मिळविला. कार्यक्रमात विविध स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्याचे प्रदर्शन करीत सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.चंद्रपूर मधील संगीत समूहाने देशभक्ती पर मनमोहक गाण्याचे प्रदर्शन करून वातावरण देशभक्तीमय केला.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा.जगदीश उर्फ मोंटू पिलारे,मा.वकार खान,मा.भूषण रामटेके,मा.इकबाल भाई जेसानी, मा.अनुकूल शेंडे,मा.डॉ. योगेश बनवाडे, मा.कल्पनाताई गेडाम,मा. प्रियंका कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युथ क्लब चे सुरज मेश्राम, शुभम राऊत, अभिजित कोसे, राजेश मेश्राम,भारत मेश्राम, राजेश माटे,पराग सिडाम,राहुल सोनटक्के, आशिष मुळे, डेनी शेंडे,रक्षित रामटेके ,उत्पल नागदेवते,सुशांत बनकर,सचिन चौधरी यांनी केले.कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
आपल्या प्रतिक्रिया द्या....