अबकी बार..... किसान सरकार अशा घोषणा देत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पारडगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुलाबी रंगाचे दुपट्टे आणि कॅप घालून सभासद नोंदणी मोहिमेला प्रारंभ झाला.
भारत राष्ट्र समिती देश पातळीवर स्वतःचा विस्तार करण्यासाठी सर्व शक्तीनिशी तयार झालेली आहे
त्यातील पहिला टप्पा म्हणून महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याचे ठरविले आहे पूर्व विदर्भाचे समन्वयक ज्ञानेश वाकुडकर आणि चंद्रपूर जिल्हा समन्वयक अरीकिल्ला वमश्रीकृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी विधानसभा समन्वयक देवनंदन ठेंगरी व निहाल ढोरे हे करीत आहे सुरू आहे.
बी आर एस चे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी आपल्या प्रयत्नातून तेलंगणा राज्य हे समृद्ध केलेले आहे शेतकऱ्यांसाठी व इतरांसाठी खूप चांगल्या कल्याणकारी योजना आपल्या राज्यात राबविल्या आहेत
शेतीसाठी 24 तास योग्य दाबाचे मोफत वीज, खरेदी केंद्रावर शेतीमालाची हमीभावाने खरेदी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रति वर्षी प्रती एकर दहा हजार रुपयाची मदत ,शेतीसाठी प्रकल्पातून अखंड मोफत पाणी ,प्रत्येक शेतकऱ्याला पाच लाख रुपयाचा जीवन विमा, अनेक निवासी गुरुकुल विद्यालय उच्चशिक्षित घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची सरकारतर्फे फी परिपूर्ती योजना, दलितांच्या उत्थानाकरिता दलित कुटुंबांना उद्योग व्यवसायासाठी दहा लाख रुपये अनुदान. ह्या सर्व योजना तेलंगणा मध्ये राबवल्या जातात ते महाराष्ट्र ते यशस्वी रित्या
राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तेलंगणानंतर बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी जर महाराष्ट्रात बीआरएस सरकार आले, तर शेतीसाठी "चोवीस तास मोफत वीज, मोफत पाणी" देण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. जनतेने याचा विचार करावा. आणि बीआरएस पक्षाच्या नोंदणीला भरभरून प्रतिसाद द्यावा, अभियानात सहभाही होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संबंधित मतदार संघ समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन. करण्यात आले आहे.