वाशिम :
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने २७ मे रोजी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा
निकाल जाहिर केला. यामध्ये वाशिम जिल्ह्याने अमरावती विभागातून
पहिला क्रमांक पटकाविला असून जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के
एवढा लागला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा
मंडळाने सोमवारी दुपारी १
वाजता दहावीच्या परीक्षेचा
निकाल ऑनलाइन जाहीर केला
आहे.
अमरावती विभागातील
पाच जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम
जिल्हा अव्वल ठरला. वाशिम
जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या
परीक्षेसाठी १९ हजार ७६५
विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली
होती. प्रत्यक्षात १९ हजार ६४१
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी
१८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण
झाले आहेत. परीक्षा दिलेल्या
११ हजार ७९ मुलांपैकी १०
हजार ६०५ मुले उत्तीर्ण झाले.
८ हजार ५६२ मुलींपैकी ८ हजार ३९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
वाशिम जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल बघितला तर यामध्ये रिसोड तालुका अग्रस्थानी आहे. या तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के असा लागला आहे.
मानोरा तालुक्याचा निकाल ९७.८३, मालेगाव ९७.१४, वाशिम ९६.०३,
कारंजा ९५.९२ आणि मंगरुळपीर तालुक्याचा ९५.०१ टक्के
निकाल लागला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....