कारंजा : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे.तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी कारंजा तालुक्यात मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.तसेच मा. जिल्हाधिकारी,वाशिम यांनी "गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण"या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हयास मिळणाऱ्या नियतव्ययाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महसूली क्षेत्रिय कार्यालयाकडून जनतेस सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" कारंजा तालुक्यातील मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.यामध्ये ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी,विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी,उत्पन्न व जातीचे दाखले,रेशन कार्ड वाटप,सामाजिक लाभाच्या योजना जसे,संजय गांधी निराधार योजना,पी.एम. किसान योजना,ॲग्रीस्टॅक, जलतारा,इ.महसूल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्राबाबत जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढण्यात येऊन मंडळ स्तरावर"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान"आयोजित करुन त्यामध्ये विविध महसूली दाखले,जनतेच्या तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करुन महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम,व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्यासाठी सदर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.त्यानुसार "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" कारंजा तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी मंडळ निहाय नियाजन करण्यात आलेले आहे,कामरगांव मंडळ दिनांक२३/०४/२०२५, हिवरा लाहे मंडळ दिं.-२५/०४/२०२५,कारंजा मंडळ २८/०४/२०२५, पोहा मंडळ दिनांक ३०/०४/२०२५ खेर्डा बु.मंडळ दिनांक - ०१/०५/२०२५,उंबर्डा बाजार मंडळ दिनांक, ०३/०५/२०२५,धनज बु. मंडळ दिनांक ०६/०५/२०२५,येवता मंडळ दिनांक ०८/०५/.२०२५ रोजी कारंजा तालुक्यातील मंडळ स्तरावर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित करुन त्यामध्ये विविध महसूली दाखले,जनतेच्या तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करुन महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहुन सदर शिबिरामध्ये संबंधित मंडळ अधिकारी व संबंधित ग्राम महसुल अधिकारी, संबंधित नायब तहसिलदार, महसुल यंत्रनेद्वारे शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता आराखडा व नियोजन करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील सर्व जनतेने "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणाल सुभाष झाल्टे, तहसिलदार कारंजा यांनी कारंजा तालुक्यातील नागरिकांना केले आहे.