वाशिम : गेल्या पाच वर्षात शासनाने शासकिय निमशासकिय समित्यांचे गठन केलेले नसल्यामुळे,जिल्हास्तरिय साहित्यीक वृद्ध कलाकार समितीच अस्तित्वात नसल्याने कलावंताना मानधन मंजूर न केल्याने,ऐन कोव्हीड 19 कोरोना महामारी काळात कलावंतावर उपासमारीची वेळ आली होती. तसेच सन 2018-19 पासून गेल्या पाच वर्षात शेकडो कलावंतानी हजारो रुपये खर्च करून मानधनाचे प्रस्ताव सादर केलेले होते. परंतु शासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष्य पणामुळे त्यांना मानधन मंजूर झालेले नाही. तसेच त्यापैकी अनेक कलावंताचे तर मानधन मंजूरीची प्रतिक्षा करीत असतांना मृत्यु देखील झाल्याचे गंभीर वास्तव आहे.