कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :- दिनांक 1 जुलै 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभहस्ते 2515 अंतर्गत तालुक्यातील आखतवाडा , यावर्डी,वडगाव रंगे येथील विकासकामांचे भूमिपूजन भूमिपूजन संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे ,प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य माननिय सौ. सुनिताताई नाखले, पंचायत समिती सदस्य माननिय श्री शुभम बोनके , प्रमुख उपस्थिती कारंजा बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता माननिय श्री शुभम जोशी आहेत तसेच गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे. आखतवाडा येथे सकाळी 9 वाजता गजानन महाराज मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन, यावर्डी येथे सकाळी 10 वाजता दुर्गा देवी मंदिर समोरील जागेला कंपाउंड बांधकाम बांधकाम करणे अंदाजेच किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन, वडगाव रंगे येथे सकाळी 11 वाजता मुंगसाजी महाराज मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन व मान्यवरांचे उपस्थित संपन्न होत आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आखतवाडा, यावर्डी,वडगाव रंगे येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.