कारंजा (लाड) :
स्थानिक वैभवसंपन्न कलानगरी असलेल्या कारंजा शहरात दि १३ मे २०२३ ते १९ मे २०२३ पर्यंत सकाळी ०९:०० ते १२ व सायंकाळी ०५:०० ते ०७:०० वाजेपर्यंत अशा दोन सत्रात स्थळ : बालाजी मंदिर सभागृह,बेंबळपाट जवळ, कारंजा येथे,येथील अविष्कार सामाजिक क्रिडा,शिक्षण व बहुउद्देशिय संस्था कारंजाच्या वतीने,नटवर्य स्व. चंद्रकांत गणेशराव मुकवाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "भव्य बालनाट्य प्राशिक्षण शिबीराचे" आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रत्यक्ष भेटीत माहिती देतांना आयोजक आश्विन जगताप यांनी सांगीतले की, "पुढच्या पिढीतून नवोदीत नाट्य कलावंताना घडविण्याच्या उद्देशाने आमच्या संस्थेने बालनाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्याचा निर्णय घेतला असून,लहान मुलांचा व शालेय विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्या सर्वांगीन विकासा करीता सदर बालनाट्य शिबीर सर्वार्थाने यशस्वी ठरवून,राज्यपातळीवर बालनाट्य प्रयोगाकरीता ते पूरक ठरविण्याचा आणि त्यांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

आणि त्याकरीता आम्ही मराठी चित्रपट व महानाट्यातील विविध अभिनेते अभिनेत्री यांना प्रशिक्षक म्हणून आमंत्रीत केले आहे.जसे की, "काळोखाच्या पारंब्या" फेम अभिनेत्री काजल राऊत ; स्वामीनी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर-शिवशंभु संभाजी महाराज फेम अभिनेते नितेश लालित ; असंख्य मराठी चित्रपटातील अभिनेते विशाल तराळ,अभिनेते प्रविण प्रभाकर, अभिनेते विशाल सदाफुले, अभिनेते मार्शल कोळेकर इत्यादी अभिनेत्यांना आम्ही प्रशिक्षक म्हणून बोलावले आहे.व ह्या प्रशिक्षकाद्वारे,राज्यनाट्य स्पर्धेकरीता चाळीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले." तरी इच्छुक पालकांनी आपल्या मुलांना या बालनाट्य प्रशिक्षण शिबीरात सहभागी करण्याकरीता अश्विन जगताप,मो. 9823762220; श्रद्धा रगडे,मो. 7666285259 ; पायल कोळसकर,मो.7522903324 ; वैष्णवी गाढवे,मो. 8766939458; निता पापळकर,मो. 8999380972 ; अर्पिता रामदेवकर,मो. 7385413673 ; विद्या भांडेकर,मो. 9960556125 ; सोनाली पायल,मो. 9923454609 ; किंवा प्रमोद चव्हाण,मो. 9850394594 ; यांचेकडे सशुल्क नाव नोंदणी करावी.असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्य स्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....