नेमकाच रमजान महिना येऊन रमजान ईद पार पडली . सलग दोन वर्षाच्या कालखंडानंतर भारतीय नागरीक आपले सण उत्सव परंपरा साजरे करीत आहेत . अशातच राजकारणासाठी "भोंगा" पुढे आला . आणि या भोंग्याने महाराष्ट्रातील शांतता भंग होते की काय ? असे वाटू लागले . राजसाहेबांनी जणू आपलेच बंधू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले . परंतु तिन पक्षाच्या सिहासनावर विराजमान असलेले उद्धव ठाकरे हे सुद्धा मुरब्बी राजकारणी निघाले . त्यांनी राजसाहेबाच्या माध्यमातून हे षढयंत्र कुणाचे ? ते ओळखले . फारसे गंभीर न होता . शांततेने गृहमंत्रालयाची बैठक घेतली . दिर्घानुभवी मातब्बर राजकारणी तथा गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या मार्फत पोलीस अधिकाऱ्यांवरच महाराष्ट्रीयन जनतेच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी सोपविली . व पोलिस विभागाने सुद्धा निर्विघ्नपणे ती पार पाडली . आणि बुधवार दि. ४ मे रोजी काय होणार ? याची भिती बाळगणाऱ्या तमाम महाराष्ट्रीयन नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला . परंतु याचे खरे श्रेय द्यायचेच झाले तर ते मात्र महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम जनतेला जाते . मुस्लिम समाजाने सामंजस्याने विचारविनिमय केला . राजसाहेबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य केले . येथील जनता मग ती हिंदु असो किंवा मुस्लिम आपलीच आहे . याचा विचार केला . नेमकेच आपण कोरोना सारख्या महाआपत्ती पासून सहीसलामत सुखरूप वाचलो . याची जाण ठेवली . आधीच आपण बेरोजगारी, प्रचंड महागाईमुळे होरपळत आहो . हे सत्य जाणले . निष्पक्ष महाराष्ट्रात जातीयवादाचे जहाल विष निर्माण व्हायला नको . हे जाणले आणि कमालीचा संयम, शांतता ठेवली . मस्जिदही आपली . मंदिरही आपलेच . हिंदूही आपलेच . मुस्लिमही आपलेच . याचा कटाक्षाने विचार केला . आज प्रत्येक मस्जिद वरील भोंगे बंद ठेवण्यात आलेत . जेथे कोठे चालू असतील त्या भोंग्यांचा आवाज नेहमीपेक्षा फारच कमी होता . तर हिंदु बांधवानी सुद्धा मंदिरातील भोंगे बंद ठेवले . अजान,काकडआरती, हरिपाठ भोंग्याविना पार पडलेत . सर्वत्र शांतता पहायला मिळत होती . तसेच यानंतरही भविष्यात सर्वसामान्य हिंदु मुस्लिम राजकारणाचे बळी पडणार नाहीत . आम्ही आमचे समाजाचे, गावाचे, जिल्हयाचे व राज्याचे वातावरण बिघडविणार नाही . आम्हाला शांती, सयंम, अहिंसा हवी आहे . जीवन जगत असतांना समाजात एकमेंका सोबत राहूनच जीवन जगावे लागते . हिंदु मुस्लिम सर्व आपलेच आहेत त्यामुळे सर्वधर्म समभाव राखीत येथील जनतेने एकात्मतेचे व जातीय सलोख्याचे दर्शन घडवीले असल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे .