वेगवेगळ्या दोन ठिकाणी सापाने दंश केल्याने दोघांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. गोंदिया तालुक्याच्या इशाटोला (गंगाझरी) येथील ओमप्रकाश धनराज प्रधान (३०) यांना ८ जुलै रोजी सापाने दंश केल्याने त्यांचा प्रथमोपचार कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुसरी घटना गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील आहे. रामकुमार वसंतराव बावणकर (४८) रा. खमारी यांना ८ जुलै रोजी सापाने दंश केल्याने त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार सुरू असून या घटनांची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.