कारंजा (लाड) : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र तिर्थक्षेत्र,श्रीक्षेत्र कारंजा (लाड) येथे आषाढी एकादशी निमित्त,बुधवार दि 17 जुलै रोजी, कारंजा येथील श्री प्रकाश दादा डहाके निसर्ग पर्यटन केन्द्रा समोरील टेलीफोन कॉलनी,कारंजा येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये सकाळी 05:00 वाजेपासून रात्री उशीरापर्यंत दर्शना करीता लाखो भाविकांची मांदियाळी अनुभवायला मिळाली. यावेळी मुर्तिजापूर मार्ग आणि बसस्थानक मार्गाकडून मंदिरा पर्यंत वारकऱ्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मात्र भाविक वारकरी शांती, संयम, शिस्तीने पाडूरंगाचे पदस्पर्श दर्शन घेऊन धन्य होत होते.शिवाय आषाढी एकादशी निमित्त कारंजेकर महिला वारकरी मंडळींनी उत्स्फूर्तपणे दिंडी काढून अभंग,भजने,फुगडी व पाऊल्या खेळून कार्यक्रमाला रंगत आणली. मंदिर व्यवस्थापन व . कॉलनीवासिय तसेच कारंजेकर भक्तमंडळींनी दर्शनार्थी वारकऱ्यांच्या उपवासाच्या फराळाची, पिण्याचे थंड पाणी आणि चहापानाची चोख व्यवस्था केली होती. वारकऱ्याच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनाचे सर्व सेवाधारी तसेच कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी, वाहतूक नियंत्रण विभाग कर्मचारी सेवा देत होते.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.