कारंजा : आपआपसातील मतभेद मिटवून,प्रेम व सद्भावना वाढविणाऱ्या होळी या प्रमुख सणानिमित्ताने,नैसर्गिक समतोल राखीत, धूरविरहित आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे,तसेच होळीचा बहाणा करून दारू,गांजा,अफिम इ.नशायुक्त व्यसने न करता त्याऐवजी दही,दूध,ताक,लिंबू शरबत प्राशन करून तसेच पक्षी प्राणी इ.च्या हत्या करून मासांहार भक्षण करण्यापेक्षा पुरणपोळी वगैरे मिष्टान्न पदार्थाचा आहार घेऊन आणि रासायनिक व शारिरिक इजा देणाऱ्या रंगाऐवजी गुलाल,अष्टगंध,फुले उधळून,एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा देऊन होळी हा आपल्या भारतमातेच्या संस्कृतितील पवित्र असा सांस्कृतिक सण आनंद व उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी केले असून त्यानिमित्त,श्री चवऱ्या महादेव संस्थान शेलूवाडा येथे, पोर्णिमेचे मुहूर्त साधून,मंगळवार दि.०७ मार्च २०२३ रोजी सकाळी ठिक ११ : ०० वाजता, सद्भावना रंग संगीतमैफिल,रंगीबेरंगी कविसंमेलन तसेच "बुरा मत मानो होली है।" हा आदर्श असा पदवीदान सोहळा आयोजीत केला.
असून, सदरहू कार्यक्रमाला नंदकिशोर कव्हळकर,सुनिल डाखोरे,पांडूरंग माने, प्रदिप वानखडे,मोहित जोहरापूरकर,गोपीनाथ डेंडूळे,ओंकार मलवळकर, डॉ.स्नेहल राऊळ, डॉ.आशिष सावजी,शिवाजीराव गायकवाड,रामबकस डेंडूळे, देविदास नांदेकर,सुनिल गुंठेवार, रोमिल लाठीया,दादाराव सोनिवाळ,विजय राठोड,विलास ठाकरे,संजय कडोळे,उमेश अनासाने,कैलास हांडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून,त्यानिमित्त जास्तित जास्त लोककलावंत,गायक मंडळी, कवी व संस्थेचे पदाधिकारी तथा हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड यांच्याकडून करण्यात आले आहे.