सिंदेवाही तालुक्यातील उमा नदीवरून रेतीची वाहतूक करताना पहाटे 4 वाजता ट्रॅक्टर अपघातात एक इसम ठार झाल्याची घटना येथे आज घडली. मनोहर ऋषी पात्रे असे मृतकाचे नाव आहे. रत्नापूर निवासी मनोहर पात्रे याला बांधकामासाठी रेतीची आवश्यकता असल्याने रेती विकत घेतली. ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 34 एल 9619 ने रेती भरून आणली. रेती खाली करताना ट्रॅक्टर मागे घेताना मनोहर पात्रेला टक्कर लागली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रॅक्टर जप्त करून चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.