अकोला- स्थानिक डाबकी मार्गावरील वानखडे नगर येथील कर्ता हनुमान मंडळ, दमानिया नेत्रालय, ईनरव्हील क्लब व सत्य साई संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शत्रक्रिया व भव्य रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
गेल्या १७ वर्षांपासून कर्ता हनुमान मंडळाद्वारा मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने पाटील यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा दिवस व संविधान दिवस असल्यामुळे शहीदांना श्रद्धांजली व संविधान शपथ घेऊन, मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून आता पर्यंत गेल्या पंधरा वर्षांपासून ५२३७ शिबिरांद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मंडळातर्फे दर रविवारी मोफत तपासणी व औषधी वाटप असते. मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये एकूण ४२६ रुग्णांची दमानिया नेत्रालयाचे डॉक्टर दत्ता पवार, अजय देशमुख, संतोष पुंड, सुनील सरोदे यांच्या टीमने तपासणी केली. त्यामध्ये २१० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या. तर ८५ रुग्णांना नाममात्र दराने चष्मे वाटण्यात आले.
डॉ. सुमित गौतमरे हृदयरोग तज्ञ, डॉ. विवेक गौतमरे, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. तेजराव नराजे, औषधी वितरक ज्ञानदेव बदरखे यांनी एकून ८६ रुग्ण तपासून ५ रुग्ण ईसीजी साठी गोतमारे हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले. ९ रुग्णांना रक्त लघवी तपासणी नाममात्र दराने करून त्यांना सर्वांना मोफत औषधी देण्यात आली. तर सत्य साई संघटनेचे अध्यक्ष किशोर रत्नपारखी यांनी उपलब्ध करून दिलेला औषधी पुरवठा संघटनेच्या वतीने वाटप करण्यात आला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष निलीमा ठाकरे, सचिव जयश्री शास्त्रकार व सदस्या ज्योती शेवटकार व सदस्या सरिता पाडिया यांचा सत्कार माजी नगर सेविका मंगला म्हैसने यांनी मंडळाचे वतीने केला. कार्यक्रमाला प्रहार संघटनेचे महानगराध्यक्ष मनोज पाटील, डॉ. अशोक ओळंबे, माजीनगर सेविका सौ. मंगला म्हैसने, मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश ढोरे, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाप्रमुख संतोष बाजोळ, मराठा महासंघाचे नंदकिशोर गावंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, आभार प्रदर्शन विठ्ठल चिकटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शर्मा ताई, चंद्रकात ताठे, संजय बहाळ, डॉ. प्रमोद हेलगे, हिमंतराव पोहरे, प्रकाश जाधव, विलास आगरकर, मुरलीधर आव्हटे, संतोष जाधव, वसंता माळी, देवालाल उजाडे, भिकाभाऊ भगत, कोकाटे साहेब व कर्ता हनुमान मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....