अकोला - युगपुरुष छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे व प्रदेश समन्वयक ईश्वरजी बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात“ स्वराज्य सप्ताह ” साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष अनिल मालगे यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता स्थानिक पोळा चौक जुने शहर अकोला येथे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी लहान मुलांना व त्यांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार,दूरदृष्टी,व शैली अंगीकारुन आई-वडिलांनी लहान मुलांना शिक्षण द्यावे असे म्हटले
यावेळी अ गटामधून प्रथम क्रमांक शंभू मालगे शिवाजी महाराज वेशभूषा ,दुसरा क्रमांक ओवी नांदुरकर जिजाबाई, तिसरा क्रमांक अथर्व चोपडे शिवाजी महाराज, तर प्रोत्साहन पर प्राजक्ता राठोड जिजाबाई यांना पारितोषिक तर ब गटामध्ये प्रथम क्रमांक हर्षल गमे तानाजी मालुसरे यांची वेशभूषा दुसरा क्रमांक प्रणव मालगे शिवाजी महाराज वेशभूषा तृतीय क्रमांक समर्थ चोपडे शिवाजी महाराज वेशभूषा तर प्रोत्साहन पर स्वराज राठोड मावळा असे अ गटामध्ये चार पारितोषिके व ब गटांमध्ये चार पारितोषिके देण्यात आली
अ गटातील पारितोषिके सिने निर्माता सौ राधाताई तुकाराम भाऊ बिडकर यांच्यातर्फे देण्यात आले तर ब गटातील पारितोषिके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्यातर्फे देण्यात आले यावेळी सर्व स्पर्धकांना महाराजांचा फोटो रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्री विनय टोले एडवोकेट नीलिमाताई शिंगणे जगड वंदनाताई शिंगणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतील गटनेते मनोज गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय मते ,राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश सावंल, व युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी बुढन गाडेकर व संताजी शाळेचे श्री नांदुरकर सर व स्वराज्य महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ आशा मालगे यांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश चोपडे,आशिष मालगे ,मनोज गमे,आदित्य मालगे,साहील शेख,अजय जहागीरदार, गणेश भुजबले संतोष उमाळे, आदीनी परिश्रम घेतले सर्व स्पर्धकांना आमदार अमोल दादा मिटकरी माजी आमदार प्रा तुकाराम भाऊ बिडकर व महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले अशी माहिती आलेश मालगे यांनी दिली